रस्त्यात अजगर आल्याने अर्धा तास वाहतूक खोळंबा
बांदा/प्रतिनिधी
बांदा पत्रादेवी रस्त्यावर रामनगर येथे भर रस्त्यात असलेल्या अजगर सापाला फुल पॉवर बॉईज ग्रुपच्या युवकांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. भर रस्त्यात अजगर असल्याने सुमारे अर्धा तास दुतर्फ वाहतूक खोलंबली.
काल रात्री उशिरा भर रस्त्यात भला मोठा अजगर असल्याचे दुचाकी चालकांच्या निदर्शनास आले. त्यांनी या अजगरला जंगलात हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमारे अर्धा तास तो तिथेच राहिल्याने अखेर सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले.
. फुल पॉवर बॉईज ग्रुपचे युवक सनी मोटे, मुकेश तारी, शुभम साळगावकर, नितीन वराडकर, गौरेश चांदेकर, जोईल फर्नांडिस, अक्षय परब, दीपेश कुबल यांनी घटनास्थळी धाव घेत शिताफिने अजगरला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले.
