विभागीय क्रिकेट स्पर्धेत शासकीय तंत्रनिकेतन, मालवण संघ विजेता

⚡मालवण ता.२७-: आंतर अभियांत्रिकी पदविका विभागीय विद्यार्थी क्रिडा स्पर्धा बी-१ झोन, कोल्हापूर अंतर्गत “क्रिकेट” स्पर्धा संजय घोडावत पॉलिटेक्निक आटीगरे या ठिकाणी नुकतीच पार पडली. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात शासकीय तंत्रनिकेतन, मालवण संघाने महागाव पॉलिटेक्निक संघाचा पराभव करत विभागीय विजेतेपद पटकाविले.

या स्पर्धेत उपांत्य फेरीत मालवण शासकीय तंत्रनिकेतन संघाने संजय घोडावत पॉलिटेक्निक संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली होती. अंतिम सामन्यात महागाव पॉलिटेक्निक संघाचा पराभव केला. प्रत्येक सामन्यात अवघ्या १० षटकांमध्ये १०० पेक्षा जास्त धावा जमवण्याचा पराक्रम मालवण पॉलिटेक्निकच्या फलंदाजांनी केला. आता पुणे येथे ८ व ९ डिसेंबर रोजी होणाऱ्या आंतर विभागीय क्रिकेट स्पर्धेसाठी हा संघ सहभागी होईल. सदर संघासोबत संघव्यवस्थापक म्हणून श्री. प्रशांत आखूड व किशोर कांबळे यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या नियोजनासाठी प्रा.बडेकर व प्रा.कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व स्पर्धकांचे शासकीय तंत्रानिकेतन,मालवणचे प्राचार्य, डॉ.एस.ए.पाटील, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. डी. एन. गोलतकर व संस्थेचे क्रीडा अधिकारी प्रा. पी.एस.थोरात यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page