‘द्रौपदी स्थाली’ विषयावर कीर्तन
⚡कणकवली ता.२७-: परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४५ व्या पुण्यतिथी महोत्सवास शनिवार पासून प्रारंभ झाला आहे.रविवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भालचंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने भाविक भक्तांनी बाबांच्या दर्शनास रीघ लावली होती.यामुळे संस्थान परिसर बाबांच्या पुण्यतिथी उत्सवाने दुमदुमुन गेला होता.
रविवारी पहाटे भालचंद्र महाराज यांचे समाधीपूजन झाले. त्यानंतर झालेल्या काकड आरतीला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. सर्व भक्त कल्याणार्थ
भालचंद्र महारुद्र महाभिषेक अनुष्ठान झाला. दुपारी भालचंद्र महाराज यांची आरती आणि मग भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी भजनी बुवांनी भजने सादर करून बाबांच्या चरणी आपली सेवा केली.यामुळे काही काळ वातावरण भक्तीमय झाले होते सायंकाळी ह.भ.प. पुणे येथील चिन्मय देशपांडे यांनी
‘द्रौपदी स्थाली’ या विषयावर कीर्तन सादर केले. कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते. तद्नंतर रात्री दैनंदिन आरती ने आजच्या दिवसाची सांगता होणार.
