संजू परब;जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेचे झाले उद्घाटन
⚡सावंतवाडी ता.२७-: 43 वर्षे सातत्य ठेवणे हे कोणाचं काम नाही. त्यासाठी तसं व्यक्तिमत्व लागतं. तसेच तसा माणूस लागतो. तसं व्यक्तिमत्व वसंत जाधव यांचा आहे. त्यांच्या या अकॅडमीचा 100 वा वर्धापन दिन असाच साजरा व्हावा. प्रत्येक खेळात चिकाटी लागते. कोण जिंकले कोण हरले याला महत्व नाही पण त्या मुलींची जिद्द हे महत्त्वाचं आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे केले.
भाजप जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब मित्रमंडळ, सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो-कराटे – आकिदो असोसिएशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हास्तरीय भव्य ज्युदो स्पर्धा सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी श्री.परब बोलत होते.यावेळी संजू परब यांच्या हस्तेच या स्पर्धेचे शानदार उद्घाटन करण्यात आले
यावेळी भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, अजय सावंत ,सत्यवान बांदेकर,वसंत जाधव ,दत्तात्रय मारकड, बबन केवटे,आदी उपस्थित होते.
