*💫दोडामार्ग दि.०५सुमित दळवी-:* सध्याच्या घडीला रस्त्याची अवस्था बघता गाडी चालवणे म्हणजे खूप कठीण बनले आहे त्यातच कुंब्रल येथून खडी वाहतूक केली जात आहे, प्रदुषणास कारणीभूत ठरणारी खडी वाहतूक बंद करावी,आणि तात्काळ योग्य ती भूमिका घेऊन कारवाई करा, अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने दोडामार्ग तहसीलदार यांच्याकडे करण्यात आली आहे. कुंब्रल ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की,या रस्त्याने डंपर खडी वाहतूक करत असल्याने हा रस्ता अधिकाधिक निकामी होणार आहे.तसेच या रस्त्याने अवजड वाहतूक झाल्यामुळे दोन्ही बाजूला असलेली शेती,धरणाच्या पाणी, पिण्याच्या पाण्याचे साठे, मंदिर,शाळा या नावाने चालू झालेल्या वाहतुकीमुळे याच्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे ही वाहतूक बंद करा,अन्यथा आम्ही याविरोधात उपोषणाला बसणार आहोत, असा इशारा कुंब्रल ग्रामस्थांनी संबंधित विभागाला दिला आहे.
कुंब्रल येथून होणारी खडी वाहतूक त्वरित थांबवा…
