संदीप कुडतरकर यांचा सवाल; टीका करण्यापूर्वी जिल्ह्यातील जनतेचे मत जाणून घ्या, सुषमा अंधारेना सल्ला…
⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन राणेंवर टीका करणे म्हणजे तुमचं प्रबोधन काय …?यातून जिल्ह्यातील जनतेला काय मिळाले राणेंवर टीका करण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनि जिल्ह्यातील जनतेचे मत ऐकून घ्यावे राणे कुटुंबीयांनी जिल्ह्यासाठी जेवढे केले आहे त्यातील एक टक्का काम तरी सेनेने केले आहे का..? असा सावल भाजपचे नेते संदीप कुडतरकर यांनी उपस्थित केला.
दरम्यान यापुढे राणें कुटुंबांवर टीका केल्यास जशास तसे उत्तर देऊ असा इशारा त्यांनी यावेळी दिला. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी संजू परब उपस्थित होते.
