माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी जाहीर केले गुपित
⚡सावंतवाडी ता.११-: बेसिक विकास सोडला तर तेरा वर्षात मंत्री दिपक केसरकर यांनी शुन्य विकास केला निवडणुका आल्या की हायमास्ट लावून मते मागणारे केसरकर त्यावेळी साधी तलाठ्याची बदली करु शकले नाही हेच त्यांच्या आणि माझ्यातील वादाचे कारण ठरले अशी टिका माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे केली.
तर आजपर्यंत केसरकरासोबत राहिलेले मोठ्या पदापर्यंत का गेले नाही का मोठे होऊ शकले, केसरकरांनी कोणाला मोठे व्हायलाच दिले नाही त्यामुळे जिल्हा बँक संचालक विद्याधर परब केसरकरासोबत राहून कधीच मोठे होऊ शकणार नाही, आणि राहीलेच तर ती त्याची राजकीय आत्महत्या ठरेल असेही साळगावकर म्हणाले.