मनसेची पोलीस निरीक्षक यांच्याकडे मागणी;कारवाई करण्याचे पोलिसांचे आश्वासन
⚡सावंतवाडी ता.११-: येथील शहरासह ग्रामीण भागातील कॉलेज परिसरात युवक मोठ्या प्रमाणात धूम स्टाईल बाईक किंवा फोर व्हीलर वेगाने चालवत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणाहून चालणाऱ्या पादाचाऱ्यांत भीतीच वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, यामुळे मध्यंतरीच्या काळात देखील अनेक अपघात देखील घडले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधित कॉलेज शी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षकांकडे निवेदनद्वारे केली आहे.
याबाबत लवकरच त्या कॉलेज परिसरात पोलीस तैनात केले जातील, असे आश्वासन यावेळी पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिली.
यावेळी शहराध्यक्ष आशिष सुभेदार, तालुका उपाध्यक्ष प्रकाश साटेलकर, उपशहर अध्यक्ष शुभम सावंत, प्रवीण गवस, सचिव कौस्तुभ नाईक, दर्शन सावंत, सोनू सावंत, रवींद्र दळवी आदी उपस्थित होते.