उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केला विश्वास; कार्यकर्त्यांचा वापर करून घेणे केसरकरांची ख्याती
⚡सावंतवाडी ता.२०-: येथील होऊ घातलेला खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनल विजय होईल असा विश्वास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी आज येथे केला.
दरम्यान आमच्या पॅनल मध्ये सर्व मंडळीना चांगला अनुभव आहे तसेच गेले पाच वर्षांत चांगले काम केले त्यामुळे विरोधांकानी किती बोंब मारले तरी विजय हा आमचा असल्याचा दावा त्यांनी केला. ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी राऊळ बोलताना म्हणाले केसरकर घेण्यात निवडणुकीत आमच्या पॅनल सोबत होते परंतु त्यांनी पाच वर्षात कोणतेही काम केले नाही. निवडणुकीत कार्यकर्त्यांचा वापर करून घेणे ही त्यांची ख्याती आहे त्यांच्या भूलथापांना मतदार बळी पडणार नाहीत असेही रुपेश राऊळ यांनी यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मायकल डिसोजा आदी उपस्थित होते.