किरण ठुबरे यांचा बाळासाहेब शिवसेना गटात प्रवेश वृत्त निराधार : जिल्हा सरचिटणीस भास्कर परब
⚡वेंगुर्ले ता.०९-: सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सेलची जिल्हाध्यक्ष नियुक्ती अद्याप झालेली नाही तसेच सेवादल जिल्हा कार्यकारिणीच अस्तित्वात नाही तसेच किरण ठुबरे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठल्याही संघटनेत पदाधिकारी किंवा अधिकृत सभासद नाही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल जिल्हा सरचिटणीस किरण ठुबरे यांचा बाळासाहेब शिवसेना गटात प्रवेश हे वृत्त निराधार असल्याचा खुलासा जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी केला.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत बाळासाहेब शिवसेना गटात प्रवेश वृत्त निराधार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेला बदनाम करण्याचा निरर्थक प्रयत्न होत आहे,असे बिनबुडाच्या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नावाचा उपयोग करून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न बाळासाहेब शिवसेना गटाने करू नये असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस भास्कर परब यांनी दिला आहे,