⚡सावंतवाडी ता.०८सहदेव राऊळ-: मळगाव येथील पंचायतन श्री देव रवळनाथ देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी त्रिपुरारी पौर्णिमेला उत्साहात साजरा करण्यात आला.

यनिमित्त सकाळपासून मंदिरात धार्मिक कार्यक्रम, अभिषेक दुपारी महाप्रसाद, केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम पार पडले. रात्री मंदिरासमोर असलेला दीपस्तंभ असंख्य दिवे पेटवून सजविण्यात आला होता. त्यानंतर पुराणवाचन व नंतर मंदिराभोवती पालखी प्रदक्षिणा पार पडली. रात्री मळगाव येथील दशावतार मंडळाचा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला. मळगाव तसेच परिसरातील भाविकांनी या जत्रोत्सवाचा लाभ घेतला.
