*सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
⚡सावंतवाडी ता.०८-: : चराठा-उभा गुंडा येथील एका ४५ वर्षीय तरुणाचे राहत्या घरातच मृत्यू झाला आहे. शेखर मुरलीधर बांदिवडेकर असे त्यांचे नाव आहे.
याबाबतची माहिती नंदकुमार अनंतराव बांदिवडेकर यांनी सावंतवाडी पोलिसांना दिली असून त्यानुसार सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेखर बांदिवडेकर हे एकटेच घरात राहत होते. त्यांची पत्नी आणि एक मुलगा सध्या कोल्हापूर येथे तर दुसरा मुलगा गोवा येथे कामानिमित्त राहत आहेत. मंगळवारी सकाळी ते आपल्या घरातून बाहेर न पडल्यामुळे शेजारच्या लोकांनी त्यांना हाक मारली त्यावेळी त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नसल्याने त्यांनी त्यांच्या पत्नीला याबाबतची माहिती दिली.
त्यानुसार तिने बांदिवडेकर यांच्या चुलत भावाला फोन करून याबद्दलची माहिती दिली त्यानुसार नंदकुमार बांदिवडेकर हे साडेनऊच्या सुमारास उभा गुंडा येथील त्यांच्या घरी जाऊन भाऊ शेखर याला हाक मारली तसेच दरवाजा वाजवून बघितला मात्र त्यांनी दरवाजा न उघडल्याने त्यांनी याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक गुरुनाथ भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता बेडरूममध्ये ते खाली जमिनीवर पडले
असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर खात्री केली असता ते मयत झाल्याचे समजले. मृत शेखर बांदिवडेकर यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे.
