चंदू पटेल हल्ला प्रकरणातील आरोपींचे रेकॉर्ड तपासून तडीपारीचा प्रस्ताव करणार

कुडाळ शिष्टमंडळाला एस पी अग्रवाल यांचे आश्वासन

⚡सिंधुदुर्गनगरी ता ०७-: कुडाळ एमआयडीसी येथील उद्योजक चंदू पटेल हल्ला प्रकरणी संशयितांचे रेकॉर्ड तपासून त्यांचा तडीपारीचा प्रस्ताव करण्यात येईल असे आश्वासन कुडाळातील शिष्टमंडळाला जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी सोमवारी दिले.

याहल्याप्रकरणी कुडाळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अभय शिरसाट, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक, व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये आदींनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी पोलीस अधिक्षक अग्रवाल यांनी याबाबत सविस्तर माहिती घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. असे सांगितले या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात असे लक्ष वेधले की,
पोलीसठाणे आवारा समोर घटना घडून पोलिसांनी योग्य ती दखल न घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात चंदू पटेल यांना दुखापत झाली. पोलिसांकडून योग्य ती कारवाई केल्याचे दिसत नाही.
त्यावर पोलीस अधीक्षक यांनी सदर घटनेची योग्य ती माहिती घेऊन जर आरोपीस कोणी मदत करत असेल तर त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले .सदर आरोपी ची वागणूक आणि भविष्यात त्याच्याकडून होणाऱ्या घटना हे लक्षात घेऊन त्याच्यावर तात्काळ तडीपारीची कारवाई करण्याच्या मागणी करण्यात आली. त्यावर मा. पोलीस अधीक्षक यांनी त्याचे रेकॉर्ड पाहून त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. प्राणघातक हल्लाप्रकरणी कुडाळ पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही. हा हल्ला पोलीस ठाण्या नजीकच झाला डोक्याला व चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या, एक हात फ्रॅक्चर झाला . गंभीर दुखापत होऊन सुद्धा पोलिसांनी आरोपीला पोलीस कोठडी न मागता न्यायालयीन कोठडी मागितली. मारेकऱ्यांना योग्य ती शिक्षा होण्याबाबत कुडाळ पोलिसांकडून काहीच कारवाई झाली नाही. असा कुडाळ शहरातील नागरिकांचा समज आहे. संशयीतांकडून या अगोदरही कुडाळ पोलीस ठाण्यात व अन्य ठिकाणी अशा घटना घडल्या होत्या. त्या व्यक्तीची वागणूक गुन्हेगारी स्वरूपाच्याआहे. या व्यक्तीकडून कुडाळ शहरातील नागरिक व्यापारी यांच्या जीवतास भविष्यात धोका संभवू शकतो याबाबत संबंधित आरोपी व्यक्तीच्या तडीपारची कारवाई तात्काळ करावी. अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे सोमवारी करण्यात आली.

You cannot copy content of this page