विजेच्या धक्क्याने निधन झालेल्या तनय सावंत यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत

भाजप युवा नेते विशाल परब यांनी दिले २५ हजार रुपये;

विशाल सेवा फाउंडेशनचा मदतीचा हात…

सावंतवाडी : विजेचा धक्का लागून काही दिवसांपूर्वी मयत झालेल्या रेडी येथील तनय सावंत या युवकाच्या कुटुंबाला आज सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी विशाल सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

तालुक्यातील रेडी येथील वायरमन तनय जगन्नाथ सावंत याचे हे रेडी येथे सेवा बजावत असताना काही दिवसांपूर्वी त्यांचा विजेचा धक्का लागून अपघात झाला होता. त्याचे गोवा येथे उपचार सुरु असताना निधन झाले होते. सामाजिक बांधिलकीचे भाजप युवा नेते विशाल परब यांनी त्याच्या कुटुंबाला २५ हजारांची आर्थिक मदत केली.

You cannot copy content of this page