भाजपचा सतीश सावंत यांना जोरदार धक्का
⚡कणकवली ता.०७-: शिवसेनेचे कणकवली तालुक्यातील भिरवंडे – गांधीनगर सरपंच मंगेश अनंत बोभाटे,ग्रामपंचायत सदस्य सुनीता अनाजी सावंत,सदस्य मंजुषा महादेव बोभाटे, सदस्य प्रसन्ना प्रशांत सावंत,शिवसेना कार्यकर्ते मिलिंद बोभाटे यांनी आ.नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष
शिवसेना नेते सतीश सावंत यांना भाजपाने हा धक्का दिला असल्याचे मानले जात आहे.
कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी प्रवेशकर्त्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन आम. नितेश राणे यांनी केले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गोट्या सावंत,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत,तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री,संदीप मेस्त्री,समीर प्रभूगावकर, राजू पेडणेकर,संदीप सावंत,श्यामसुंदर दळवी ,स्वप्नील चिंदरकर,रमेश सावंत, विजय सावंत, संतोष सावंत ,आनंद घाडीगावकर,सुभाष मालंडकर आदिंसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
