विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांची माजी नगरसेवकांनी घेतली भेट

परिमल नाईक, उदय नाईक, सुधीर आडीवरेकर यांची उपस्थिती;जिल्ह्याच्या विकासात्मक प्रश्नांवर केली चर्चा

⚡सावंतवाडी ता.०७-: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर हे सांवतवाडी येथे आले असता आज त्यांची माजी नगरसेवक सभापती ऍङ परिमल नाईक, श्री उदय नाईक, श्री. सुधीर आडीवरेकर यांनी सदिच्छा भेट घेतली व त्यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.यावेळी सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दुष्टीने सावंतवाडी मोती तलाव संवर्धन, मल्टी स्पेशालीटी हॉस्पीटल, शहरातील नियोजीत नळपाणी योजना, भुयारी गटार योजना, भुमीगत विजवाहीनी योजना, पर्यटन या विषयावर चर्चा केली.

तसेच गेली अनेक वर्ष कोल्हापुर खंडपीठ हा जो ज्वलंत विषय आहे त्यावर प्रदिर्घ चर्चा केली व सिंधुदुर्गातील न्यायीक पक्षकार व वकिलांना उच्च न्यायालय खंडपीठ अभावी भेडसावणारे विविध प्रश्न उपस्थित केले त्यास मा. अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यावर योग्य तोडगा लवकरात लवकर काढण्याचे आश्वसन दिले.

यावेळी श्री. महेश सारंग, ऍड परिमल नाईक, श्री. उदय नाईक, श्री. सुधीर आडीवरेकर, श्री. संतोष गवस, श्री. अमीत गवंडळकर, श्री. बाळा बोर्डेकर, श्री. रमेश बोंद्रे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page