मळगाव-सुतारवाडी येथे उद्या ‘यवनासुर’ दशावतार नाट्यप्रयोग…

*💫सावंतवाडी दि.०३-:* मळगाव-सुतारवाडी येथे महापुरुष मित्रमंडळ सुतारवाडीच्यावतीने उद्या ४ फेब्रुवारी रोजी चेंदवण येथील चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळाचा ‘यवनासुर’ हा महान पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या नाट्यप्रयोगात गणपती- दादू कोळंबकर, रिद्धी-सिद्धी-विष्णू नाईक, यवनासुर-प्रथमेश खवणेकर, नारद/म्हातारी-पंढरी घाटकर, रत्नमाला-सुधीर तांडेल, राजा सर्वेश्वर-आनंद कोरगावकर, मांत्रिक-सुनील खोजुर्वेकर, राजा-पप्पू चव्हाण, गणपती-नितीन फडके, राणी मनोरमा-रमेश साळगावकर, ब्रम्हराक्षस/म्हातारा-रमेश करंगुटकर आदी कलाकार आपली दशावतारी कला सादर करणार आहेत. त्यांना हार्मोनियम- आशिष तवटे, पखवाज-प्रमोद घावनळकर, तालरक्षक-विशाल राऊत संगीतसाथ करणार आहेत. या नाट्यप्रयोगाचा नाट्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापुरुष मित्रमंडळ सुतारवाडीच्यावतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page