वाय आर राजूरकर यांचे आवाहन
मालवण दि प्रतिनिधी
एक मनुष्य सारे जग बदलू शकतो एवढा आत्मविश्वास प्रत्येकाने आपल्या मनामध्ये बाळगला तर आयुष्याला फार मोठी कलाटणी मिळेल शिवाय समाजालाही वेगळी दिशा मिळेल म्हणून प्रत्येकाने आपल्या पाल्यामध्ये आपण पुष्कळ काही करू शकतो हा आत्मविश्वास निर्माण करावा असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. वाय. आर.राजूरकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कूलच्या १९८५-८६ या शैक्षणिक वर्षाच्या दहावी बॅचचे स्नेहसंमेलन सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. वाय. आर. राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी व्यासपीठावर सेवानिवृत्त शिक्षक जयवंत ढोलम, श्री. रविंद्र वराडकर, श्री. सदानंद पाटकर, श्री. पी. डी. कदम, मुख्याध्यापक श्री. वामन खोत, पर्यवेक्षक एच. बी. तिवले, सेवानिवृत्त शिक्षकेतर कर्मचारी चंद्रकांत आचरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सरस्वती पूजन व द्वीपप्रज्वलन करून या स्नेहमेळाव्याचा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर माजी विद्यार्थीनी सौ. अर्चना कांदळगावकर यांनी प्रास्ताविक केले. तर उपस्थित मान्यवरांचे स्वागत राजू केरकर, सुचिता पालव , सौ. नूतन करलकर , लवू केळुसकर, सुभाष जाधव, संतोष गोसावी, सौ. मंजुषा मयेकर, सौ. उज्वला वाईरकर, नितीन तळगावकर, कुसुम जिकमडे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या प्रारंभी संगीता मोंडकर – परब आणि सहकाऱ्यांनी गणेशस्तवण सादर केले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. खोत सर यांनी शाळेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तर संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पाटकर यांनी पाठविलेल्या शुभसंदेशाचे वाचन प्रफुल्ल देसाई यांनी केले.

यावेळी बोलताना श्री. राजूरकर यांनी ३७ वर्षापूर्वी या शाळेत तुम्ही शिकत असताना विद्यार्थी म्हणून वावरत होता आज पालक म्हणून समाजात वावरत असताना आपल्या पाल्याला योग्य दिशा देण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वास जागविला पाहिजे. दुसऱ्यावर आरोप करत राहणे हा आपल्यातील कमीपणा दर्शवते हे पाल्याना सांगितले पाहिजे. देशाने आपल्यासाठी काय केले त्यापेक्षा देशासाठी आपण काय करू शकतो हे आपल्या पाल्याला सांगितले पाहिजे तरच देश अधिक प्रगतीपथावर जाऊ शकतो. असे सांगून ज्ञानी तसेच वयोवृद्ध मनुष्याला वंदन करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीची जपणूक साऱ्यांनी करणे गरजेचे आहे असेही श्री. राजूरकर म्हणाले.
यावेळी सदानंद पाटकर, रवींद्र वराडकर, जयवंत ढोलम, चंद्रकांत आचरेकर या सेवानिवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सौ सुरेखा राजूरकर, सौ संध्या पाटकर, सौ प्रज्ञा जावडेकर, सौ वीणा सापळे, सौ. व्हिलेटिन रॉड्रिक्स, तसेच माजी विध्यार्थी , ग्रंथपाल आणि पत्रकार प्रफुल्ल देसाई यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. तर अभिनव जावडेकर, तुळशीदास नाईक, रणजित मडये, कृष्णा गोसावी, शांताराम अनावकर, सुनील पेडणेकर, विनोद सापळे या माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देसाई आणि संगीता मोंडकर – परब यांनी केले. तर आभारप्रदर्शन प्रफुल्ल देसाई यांनी केले. हा स्नेहमेळावा यशस्वी होण्यासाठी महेन ढोलम, दीपक चव्हाण प्रकाश रेडकर, संगीता साळगावकर, विद्याधर परुळेकर, सुभाष मांजरेकर, मॅकेनझी फर्नांडिस, दिलीप देवगडकर, जितेंद्र माशेलकर, नितीन आंबेरकर, आनंद मालंडकर,प्रभाकर भगत, नितीन आंबेरकर, संजय रोगे, प्रवीण पंगेरकर, राजेश आडकर , ललित वराडकर आदी व इतरांनी अथक परिश्रम घेतले.
