उपवनरक्षक नवकिशोर रेड्डी यांचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन
सावंतवाडी ता. ३१: दोडामार्ग तालुक्यात हत्तींपासून झालेल्या नुकसानीची भरपाई येत्या १५ दिवसात नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचवली जाईल. तसेच वनविभागाच्या माध्यमातून हत्ती प्रतिबंधक सोलर कुंपण उभारण्यात येईल, असे आश्वासन उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
दरम्यान हत्तींचा जास्त वावर असलेल्या गावात स्थानिकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तालुका मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपवनसंरक्षक श्री. रेड्डी यांची भेट घेतली. याप्रसंगी तालुक्यातील वनविभागाच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
