आकाशवाणीच्या सिंधुदुर्गनगरी केंद्राच्या प्रसारण अवधीत वाढ..
⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: आकाशवाणी सिंधुदुर्ग केंद्राच्या प्रसारणामध्ये केंद्र सरकारने वाढ केली आहे. आकाशवाणीतील विविध कार्यक्रमांचा लाभ आता सिंधुदुर्गवासीय दिवसभर घेऊ शकतील. पहाटे पाच वाजून पंचावन्नपासून सुरू होणारी प्रसारण सभा रात्री अकरा वाजून दहा मिनिटापर्यंत आता अखंडित चालू राहणार आहे.*
या दरम्यान प्रादेशिक बातम्या तसेच राष्ट्रीय बातमीपत्र, क्रीडा, कृषी, आरोग्य, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी तसेच महिलांसाठी विविध रंगी कार्यक्रमांचा समावेश असेल तर मनोरंजनासाठी विविध भारतीचे प्रसारणही यादरम्यान केंद्र प्रसारित करेल, ही माहिती गोवा आकाशवाणी आणि दूरदर्शनचे प्रमुख उपमा निदेशक सुनील भाटिया आणि सिंधुदुर्ग केंद्रप्रमुख सुजाता कहाळेकर यांनी दिली.
