मालवण किनाऱ्यावर राबविली स्वच्छता मोहीम

⚡मालवण ता.३१-: युवकांनी एकत्र येत नव्याने स्थापन केलेल्या दक्ष युवक भारत संघटनेमार्फत रविवारी मालवण बंदर जेटी समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबवून आपला पहिला उपक्रम राबविला. मालवण मधील युथ बिट्स फॉर क्लायमेट या ग्रुप सोबत संयुक्त विद्यमाने ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये दोन्ही संघटनांच्या सदस्यांनी सहभाग घेऊन किनाऱ्याची स्वच्छता करत विविध प्रकारचा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावली.

या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्वच्छता मोहिमेत दक्ष युवक भारतच्या अध्यक्ष मिली मिश्रा, युथ बिट्स फॉर क्लायमेटच्या मेगल डिसोझा, हार्दिक कदम, वरद प्रभुदेसाई, मृण्मेश उपळेकर, स्वाती पारकर, अक्षय रेवंडकर, लौकिक शिरसाट, संपदा मांजरेकर, सिया चव्हाण, गौरव कांदळगावकर, पूजा जाधव, कृतिका खोबरेकर, वैभवी सतार्डेकर, विल्सन फर्नांडिस आदी व इतर युवा सदस्य सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page