क्रीडा आणि डाकघर विभागातर्फे राष्ट्रीय एकता दौड दिवस

⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि भारतीय डाकघर विभागाच्यावतीने आज ‘राष्ट्रीय एकता दौड’ दिवस राजरा करण्यात आला.

सकाळी 7.30 वा. येथील क्रीडा संकूल ते ओरोस फाटा या मार्गावर ही एकता दौड काढण्यात आली. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळा प्रांगणात याची सांगता करण्यात आली. जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, तालुका क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सहाय्यक अधीक्षक विनायक कुलकर्णी, सुकळवाडचे पोस्टमास्तर राम वेंगुर्लेकर, विकास अधिकारी बालाजी मुंडे यांच्यासह अधिकारी –कर्मचारी सहभागी झाले होते.

You cannot copy content of this page