ओरोस ता.३१-:
बॅ नाथ पै सेवांगण कट्टाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आकाश कंदील व भेटकार्ड स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला. २१९ स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला.
प्रा मधु दंडवते यांच्या स्मृति दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आकाश कंदील व दिवाळी भेटकार्ड स्पर्धा संपन्न झाली १ ली ते ४ थी आणि ५ वी ते ७ वी तसेच ८ वी ते १० वी आणि खुला गट अशा ४ गटात आकाश कंदील स्पर्धेत १०५ व भेटकार्ड स्पर्धेत ११४ अशा
एकूण २१९ स्पर्धकानी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रा मधु दंडवते यांचे स्मृतिदिनी १२ नोव्हेंबर २० २२ रोजी दुपारी ३ वाजता बॅ नाथ पै सेवांगण शाखा कट्टा येथे
होणार आहे. सर्व स्पर्धकांचे सेवांगणच्यावतीने
अॅड देवदत्त परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, दीपक भोगटे, किशोर शिरोडकर, अरविंद शंकरदास, शाम पावसकर, बापू तळावडेकर, विकास म्हाडगुत यानी अभिनंदन केले.
दिवाळी भेटकार्ड स्पर्धेतील १ ली ते ४ थी गटात प्रथम रेवा रोहन साळोखे, द्वितीय पलक पराग महाभोज, नेहा गोपाळ गावडे, तृतीय निधी पराग गावडे, गौरव विष्णू मेस्त्री, दिव्यांश रोहीत बांवकर, उत्तेजनार्थ कौस्तुभ नांदोसकर, विदिशा गावडे, अथर्व वराडकर, गायत्री आळवे, स्वरा आळवे, ५ वी ते ७ वी गटात प्रथम तेजस नारायण सकपाळ, समर्थ संतोष भोगटे, द्वितीय सुयश संदीप कदम, हर्ष संतोष देऊलकर, तृतीय देवांग नितिन नांदोसकर, भार्गवी प्रकाश महाभोज, उत्तेजनार्थ सिद्धी जितेंद्र महाभोज, सिध्दी समिर लाड, आर्यन तुळशीदास चव्हाण, दर्शना दत्ताराम इंदुलकर. 8 वी ते 10 वी गटात प्रथम श्रावणी चव्हाण, साक्षी नाईक, द्वितीय हर्ष चव्हाण, तृतीय श्रृती लाड, वासुदेव वाक्कर, उत्तेज संस्कृती मसुरेकर, संचिता जाधव, संचिता दुखंडे, सेजल मेस्त्री, अनुजा कदम. खुला गटात प्रथम यशश्री महाभोज, द्वितीय पूर्वा मोरजकर, तृतीय अस्मिता सरमळकर, उत्तेजनार्थ प्राची रविंद्र मेस्त्री हे स्पर्धक विजेते ठरले.
आकाश कंदिल स्पर्धेतील 1 ली ते 4 थी गटात प्रथम ईश्वरी मेस्त्री, सौम्या मिठबांवकर, द्वितीय यश मेस्त्री, सिध्देश गोठणकर, कार्तिक खोत, तृतीय चैतन्य मेस्त्री, अनुश्री गोसावी, सेजल चौकेकर, उत्तेजनार्थ नितेश नागले, स्वरा गिरकर, दिव्यांशु बाक्कर, सार्थक घाडीगांवकर, चिन्मय गोंधळी, पलक महाभोज, साई थवी 5 वी ते 7 वी गटात प्रथम भावेश देऊलकर, रिया गावडे, द्वितीय समर्थ दुखंडे, निखिलेश मेस्त्री, तृतीय क्रमांक यशश्री ताम्हणकर, रिया भोगले, सुयश कदम, तेजस सकपाळ, उत्तेजनार्थ तनिष थवी, कुशल गावडे, श्रावणी निकम, साईश हिंदळेकर. 8 वी ते 10 वी गटात प्रथम सिद्धाली पांचाळ, सेजल मेस्त्री, द्वितीय मिताली मेस्त्री, शार्दुल रेवडेकर, तृतीय साक्षी नाईक, मनिष घाडीगांवकर, अनुजा कदम, उत्तेजनार्थ वामन परब, दुर्वेश दळवी, राज राणे. खुल्या गटात प्रथम चंद्रशेखर काेचरेकर, रूपेश चव्हाण, द्वितीय सायली बोडये, प्रसाद मेस्त्री, तृतीय आकांक्षा पांचाळ, उत्तेजनार्थ स्वाती पोखरणकर, उज्ज्वला गुराम, प्राची मेस्त्री यांनी बाजी मारली.
