आंबोली धबधबा येथे आली चक्कर; मित्रांनी केले आरोग्य केंद्रात दाखल
⚡आंबोली, ता.३१-: पर्यटनासाठी मित्रामसोबत गोव्याला गेलेल्या युवकाचा पुन्हा सांगली येथे परतत असताना आंबोली येथे मृत्यू झाला अनिकेत अशोक दुधाळ वय २६, रा.बामणोली, ता.मिरज,जिल्हा सांगली असे त्याचे नाव आहे त्याला आंबोली धबधबा येथे चक्कर आली यानंतर सोबत असलेल्या 3 मित्रांनी आंबोली आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र उपचार करत असताना त्याला हृदय विकार झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला.
ही घटना काल संध्याकाळी घडली आज आंबोली पोलीस हवालदार दत्ता देसाई आणि दीपक शिंदे यांनी पंचनामा केला. व त्यानंतर शवविच्छेदन करण्यात करून मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला नातेवाईक आणि मित्र परिवार आंबोलीत आरोग्य केंद्रात दाखल झाले होते.त्यांच्याकडून शोक वेक्त होत होता
