माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी सार्वजनिक बांधकामचे वेधले होते लक्ष
⚡सावंतवाडी ता.३१-: अखेर अनावश्यक ठिकाणी उभारण्यात आलेला दिशादर्शक फलक माजी नगरसेवक श्री सुरेश भोगटे यांच्या निवेदनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हटवला.
याबाबतची अधिक माहिती अशी की सावंतवाडी शहराच्या हायवे रस्त्यावर पणजी मुंबई कोल्हापूर सावंतवाडी बेळगाव अशा जोड रस्त्यावर लावण्यासाठी सार्वजनिक बांधकाम चे ठेकेदार नेमून त्यावर शासनाचा लाखो रुपये खर्च केला जात असतो मात्र चुकीच्या धोरणामुळे वैश्य वाडा या ठिकाणी लावण्यात आलेला दिशादर्शक फलक हटवण्याची मागणी या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश भोगटे नाना गोंधळकर सतीश नार्वेकर सत्यजित धारणकर व इतर मंडळींनी जनतेच्या पैशाचा दुरुपयोग करून अनावश्यक ठिकाणी हजारो रुपये खर्च करून शासनाचा गलथान कारभार उघडकीस आणला होता. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ फलक हटवण्याची कार्यवाही केली. त्यामुळे भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
