मठ येथे २ व ३ रोजी दीपावली शो टाईम

⚡वेंगुर्ला ता.३१-: मठ-टाकयेवाडी येथील संत लालाजी भक्त मंडळातर्फे दि. २ व ३ नोव्हेंबर रोजी दीपावली शो टाईमचे आयोजन केले आहे.

  दि. २ रोजी सायंकाळी ६ वाजता पहिली ते सातवी या लहान गटामध्ये जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार असून यातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे १०००, ७००, ५०० व उत्तेजनार्थ ३०० रुपयांचे रोख बक्षिस व प्रमाणपत्र तर जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा मोठ्या गटातील (१३ वर्षावरील) प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे १५००, १०००, ७०० व उत्तेजनार्थ ५०० अशी रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तर यानंतर पहिली ते सातवी या लहान गटासाठी होणा-या तालुकास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३००, २०० व उत्तेजनार्थ १०० अशी रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मठ सरपंच तुळशीदास ठाकूर यांच्या हस्त होणार आहे. तर स्पर्धेचे बक्षिस वितरण ३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर दत्त माऊली दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. अधिक माहितीसाठी के.जी.गावडे (९४०३३६९५३६) यांच्याशी संफ साधावा.
You cannot copy content of this page