वेंगुर्ले शाळा नंबर १ येथील नरकासुर स्पर्धेतील मोठ्या गटात वांद्रेश्र्वर मित्रमंडळ प्रथम

लहान गटात धोकमेश्र्वर सातेरी मित्रमंडळ प्रथम;विवेक कुबल, कुबलवाडा, माणिक चौक मित्रमंडळाचे आयोजन

⚡वेंगुर्ले ता.२९-: सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल व कुबलवाडा व माणिकचौक मित्रमंडळ, वेंगुर्ले यांच्यावतीने रविवार रात्रौ 8 वाजता श्रीदेव रामेश्वर मंदिर समोरील वेंगुर्ले शाळा नं. 1 चे पटांगणावर आयोजित केलेल्या भव्य नरकासुर स्पर्धेत मोठय़ा गटात वांद्रेश्वर मित्रमंडळ वेंगुर्लेच्या नरकासुरास तर लहान गटात धोकमेश्वर सातेरी मित्रमंडळ पाटीलवाडा, वेंगुर्ले यांच्या नरकासुरांनी प्रथम क्रमांक पटकाविले.

या नरकासुर स्पर्धेत मोठय़ा गटांत 10 तर लहान गटात 15 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या नरकासुर स्पर्धेत मोठा गटात व्दीतीय- क्रमांक गिरपवाडा मित्रमंडळ, वेंगुर्ले, तृतीय क्रमांक- यंगस्टार मित्रमंडळ केरवाडा तर उत्तेजनार्थ क्रमांक झकास मित्रमंडळ, वेंगुर्ले यांनी तर लहान गटात व्दीतीय क्रमांक- महाजनवाडी मित्रमंडळ, वेंगुर्ले, तृतीय क्रमांक- आनंदवाडी मित्रमंडळ, वेंगुर्ले व उत्तेजनार्थ क्रमांक- गाडीअड्डा मित्रमंडळ, वेंगुर्ले यांनी पटकाविले. या स्पर्धेतील मोठय़ा गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे रु. 7000/- रु. 5000/- रु. 3000/- व उत्तेजनार्थ विजेत्यास रु. 1000/- तर लहान गटातील प्रथम तीन क्रमांकास विजेत्यास रु. 3000/-, रु. 2000/-, रु. 1000/- व उत्तेजनार्थ विजेत्यास रु.500 या स्वरूपात ठेवण्यात आलेल्या बक्षिसांचे सामाजिक कार्यकर्ते व पुरस्कर्ते विवेवेक कुबल यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यावेळी कुबलवाडा व माणिकचौक मित्रमंळडाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page