पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची मालवण पोलीस ठाण्यास भेट

⚡मालवण ता.२८-; सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी शुक्रवारी सायंकाळी मालवण पोलीस ठाण्यास ‘सरप्राईज व्हिजीट’ दिली. यावेळी उपस्थित पोलीस अधिकारी नितीन नरळे यांच्याकडून पोलीस ठाणे येथील कामकाजाचा आढावा घेत संपूर्ण पोलीस ठाण्याची पाहाणी करत कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्या नंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना भेटी देत आढावा घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर मालवण पोलीस ठाणे येथे भेट देऊन आढावा घेण्यात आला. याठिकाणी तसेच जिल्ह्यातील ज्या अन्य पोलीस ठाण्यात कर्मचारी संख्या कमी आहे. त्या ठिकाणी कर्मचारी संख्या वाढवून देण्याबाबत जिल्ह्याचा आढावा घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहितीही पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

You cannot copy content of this page