⚡सावंतवाडी ता.२८-: :सावंतवाडी राष्ट्रीय काँग्रेस तालुकाध्यक्षपदी महेंद्र सांगेलकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र प्रदेश काँग्रेसकडून त्यांना प्राप्त झाले.
महेंद्र सांगेलकर यांची फेरनिवड करण्यात यावी यासाठी तालुकास्तरावर ठराव घेण्यात आला असून तो प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आला होता, त्यानुसार हे पत्र आज प्राप्त झाले आहे. हे गेले अनेक वर्ष राष्ट्रीय काँग्रेसला बळकटी देण्याच काम सांगेलकर यांनी केले आहे.
या आधी देखील ते तालुकाध्यक्ष असताना अनेक विरोधी पक्षांना धक्का देत आपल्या पक्षात त्यांनी युवकांचे प्रवेश करून घेतले. त्यांच्या या संघटित कामामुळे त्यांची पुन्हा फेरनिवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष ईशाद शेख यांनी अभिनंदन केले.
