सातुळी बावळाट नदीत युवकाचा बुडून मृत्यू

घटनेने परिसरात हळहळ

⚡सावंतवाडी ता.२८-: सातुळी-बावळाट येथील आपल्या मित्रांसमवेत नदीत पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाला. सदर घटना शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. साहिल उर्फ सगुण राऊळ असे त्या मृत युवकाचे नाव आहे.

सगुण बुडाल्याची बातमी समजताच ग्रामस्थांनी नदीकिनारी धाव घेतली. मात्र त्याचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात त्यांना यश आले नाही. अखेर बाबल अल्मेडा पथकाच्या मदतीने त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सगुणच्या पश्चात आई-वडिल-बहिण असा परिवार आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, सहायक पोलीस तौसिफ सय्यद दाखल झाले होते.

You cannot copy content of this page