पोईप येथील तिरंगी भजनबारीला रसिकांची उत्स्फूर्त दाद

⚡मालवण ता.२८-: मालवण तालुक्यातील पोईप गावातील वेताळ मंदिर येथे भाऊबीज निमित्त जंगी तिरंगी भजन बारी संपन्न झाली. यामध्ये बुवा प्रवीण सुतार, बुवा दिनेश वागदेकर, बुवा विनोद चव्हाण यांच्या सवाल जवबाने रंगलेल्या या तिरंगी बारीने उपस्थित भजनप्रेमींचे मनोरंजन केले. तिन्ही बुवांच्या कलेला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

यानिमित्त इयत्ता दहावी आणि बारावी परीक्षेत यश मिळविलेल्या मुलांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये रुपाली पांडुरंग चव्हाण, श्वेता शामसुंदर पोईपकर, अभिषेक रुपेश तावडे या गुणवंत मुलांना सन्मानचिन्ह व रोक रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोईप गावचे गाव प्रमुख परशुराम नाईक, गोपीनाथ पालव दत्ताराम पालव, अरुण माधव, पंकज वर्दम, राजेंद्र पालव आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page