महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

४१ रक्तदात्यांनी केले रक्तदान

⚡सावंतवाडी ता.२७सहदेव राऊळ- : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ४१ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने जादूगार केतन सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबिर आयोजित केले होते..

शिबिराचे उदघाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, बालरोग तज्ञ डॉ. संदीप सावंत, आयुर्वेदिक तज्ञ डॉ. सागर जाधव, जिल्हा सचिव बाळा पावसकर, तालुका अध्यक्ष गुरुदास गवंडे, परिवहन जिल्हाध्यक्ष ॲड. राजू कासकर, माजी उपजिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, माजी शहराध्यक्ष अभिमन्यू गावडे, कुडाळ प्रभारी तालुकाध्यक्ष सचिन सावंत, मनविसे कॉलेज युनिट अध्यक्ष साहिल तळकटकर, जादूगार केतन सावंत. अर्पिता मळेकर, दिपाली राऊळ, आदित्य राऊळ, शतायु जांभळे, तुकाराम मुळीक, उदय सावंत, आदित्य कोंडविलकर, विशाल दळवी, अनुष्का मळेकर, आकाश मराठे , अनिकेत दळवी आदी उपस्थित होते. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब मार्गदर्शन करताना म्हणाले, रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे कार्यक्रमाला आलेले सर्व तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा मनसेच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी घ्यावा. आपले कार्य पाहून देवालाही आपण जन्म दिल्याचा अभिमान व्हावा असे कौतुक जिल्हाध्यक्ष परब यांनी केले. रक्तदान शिबिर संयोजकामुळे समाज सुंदर होत आहे. त्यातूनच कार्यकर्त्याची भावी पिढी घडणार आहे दुसऱ्यासाठी जगणे हेच खरे जगणे या कार्यक्रमातून करत केतन सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त चांगल्या कार्याची सुरुवात केली आहे. त्यामुळे यावेळी त्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत मनसेचा जिल्हाध्यक्ष म्हणून अशा सामाजिक कार्यक्रमासाठी मी सदैव आपल्या सोबत असल्याचे त्यांनी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासन दिले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, मनसे विद्यार्थीसेना जिल्हाध्यक्ष सुधिर राऊळ, माजी शहराध्यक्ष अभिमन्यू गावडे यांनी रक्तदान केले. यावेळी जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना पोहे, बिस्कीट, व चहा वाटप केतन सावंत व सुधीर राऊळ यांनी केले..

You cannot copy content of this page