जिल्ह्यातील प्रत्येक घरात किमान एक सरकारी अधिकारी घडवणे हे युनिकचे ध्येय्य :सचिन कोर्लेकर

⚡कणकवली ता.२५-: केवळ दहावी- बारावी मध्ये एक नंबर नको तर बारावी नंतर तीन वर्ष तयारी करून पहिल्याच प्रयत्नात अधिकारी होण्यासाठी प्रयत्न असायला हवेत. एमपीएससी युपीएससी सारख्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्हा नेहमी मागे असतो याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर त्यासाठी समाजातील सर्वच घटकांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत, तेंव्हाच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अपेक्षित आहे यासाठीच जिल्ह्यातील प्रत्येक घरात किमान एक सरकारी अधिकारी होणे गरजेचे आहे हेच युनिक अकॅडमी ध्येय्य आहे असा विश्वास युनिक अकॅडमी कणकवलीचे संचालक सचिन कोर्लेकर यांनी व्यक्त केला.

‘साद फाउंडेशन सिंधुदुर्ग’ आयोजित, युनिक अकॅडमी कणकवली च्या ‘यशवंतांचा स्नेहमेळावा आणि दीपोत्सव’ कार्यक्रम फ्लोरेट कॉलेज, कणकवली येथे उत्साहात नुकताच संपन्न झाला.

यावेळी.प्रमुख मार्गदर्शक राजेंद्र इंगळे ,चैतन्य क्लासेसचे प्रमुख अच्युत देसाई, खारेपाटण ग्रामविकास अधिकारी आर. जी. वेंगुर्लेकर, समता कोर्लेकर, युनिक अकॅडमी कणकवलीचे संचालक सचिन कोर्लेकर, साद फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि कुडाळ नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी गितांजली नाईक, सिंधुदुर्ग लेखा परीक्षा लिपिक महेश चव्हाण, मंत्रालय संसदीय क्लर्क स्वप्नाली सावंत, रत्नागिरी तलाठी व प्रा, रमाकांत पांचाळ , मालवण -हडी तलाठी प्रितम भोगटे असे युनिकचे यशवंत व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रमुख मार्गदर्शक मा.इंगळे यांनी स्पर्धा परीक्षा पद्धती आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोण यावर मार्गदर्शन करताना सांगितले की कोणतीही परीक्षा कठीण नसते त्यामध्ये सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळते.


साद फाउंडेशन च्या अध्यक्षा गितांजली नाईक प्रास्तवीक आणि यशवंताचे मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, जिल्ह्यातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्यासाठी साद फाउंडेशनची साथ असणार आहे. जिल्ह्यातील पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेकडे सकारात्मकतेने पाहायला हवे. मंत्रालयात काम करत असलेल्या स्वप्नाली सावंत म्हणाल्या की यश मिळत नाही तो पर्यंत खूप त्रास असतो. ग्रामीण भागात राहणारी मी आज मंत्रालय च्या संसदीय कामकाज विभागात काम करते ही माझ्यासाठी अनपेक्षित घटना आहे.कमी वयात मी आज इथ पर्यंत पोहोचू शकले ते स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासातूनच. रमाकांत पांचाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, यशस्वी होण्यासाठी आपल लक्ष निर्धारित करायला हवे आणि त्यासाठी लागणारी समतोल मानसिक अवस्था , जिद्द , चिकाटी,तळमळ असेल तर आपल्याला यशापासून कोणी ही रोखू शकत नाही. मालवण-हडी येथे तलाठी असलेल्या प्रितम भोगटे म्हणल्या की, कोकणातील मुलांनी पहिल्यांदा एखादा क्लास केल्यानंतरच सेल्फ स्टडी केला पाहीजे. विद्यार्थ्यांनी तयारी करताना किमान एमपीएससी क्लासवन ची तयारी करावी इतर सर्व पोस्ट ची तयारी आपसूकच होते. युनिक कणकवली आणि साद फाउंडेशन सिंधुदुर्ग यांना लागणारी मदत आमच्याकडून केली जाईल असा विश्वास सर्व यशवंताच्या वतीने व्यक्त केला.

You cannot copy content of this page