मालवण शहर मनसेतर्फे दिवाळी देखावा व किल्ला स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.२५-: मालवण शहरात दिवाळी व दिवाळी पाडव्यानिमित्त विविध देखावे, मातीचे किल्ले बनविले जातात. हे औचित्य साधून मनसे मालवण शहराच्या वतीने दिवाळी देखावा व किल्ला देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे आयोजन मनसे मालवण शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी बनविलेल्या देखावा व किल्ला यांचा फोटो ९३०९३२३१५५ या व्हॉट्सअप नंबरवर पाठवावेत. विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक देण्यात येणार आहेत, अशी माहिती विशाल ओटवणेकर यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page