रेडकर हॉस्पिटल येथे मोफत मधुमेह, हृदयरोग तपासणी

वेबसाईटचे उद्घाटन

मालवण (प्रतिनिधी)

मालवण येथील रेडकर हॉस्पिटल व रिसर्च सेंटर तर्फे मधुमेह आणि हृदयरोग यासंबंधीचे मोफत तपासणी शिबिर पार पडले. यावेळी रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर ट्रस्टच्या https://rhrchealthservices.org या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले.

पोलीस स्मृतीदिनाचे औचित्य साधून रेडकर हॉस्पिटलमध्ये आयोजित कार्यक्रमात पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे तसेच रेडकर हॉस्पिटल रिसर्च ट्रस्टच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ. विवेक रेडकर, डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. रामचंद्र चव्हाण, डॉ. श्रुती हिर्लेकर, डॉ.धनंजय सावंत, डॉ. स्वप्नाली ओरसकर, वेब डिझायनर आशिष पेडणेकर, सौ. पल्लवी खानोलकर- तारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चव्हाण, पोलीस अधिकारी श्री. शिवगण, श्री. जानकर, श्री. पाटील, श्री. पेडणेकर, वाहतूक पोलीस गुरुदास परब यांसह हॉस्पिटलच्या परिचारिका व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. रामचंद्र चव्हाण यांनी उपस्थितांचा परिचय करून देत ट्रस्टतर्फे राबविण्यात येणाऱ्या आरोग्यविषयक विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी या उपक्रमाचे पोलिस निरीक्षक श्री. यादव यांनी कौतुक करत रेडकर हॉस्पिटलच्या पोलिसांप्रती असलेल्या सहयोगाचा दाखला देत ट्रस्टच्या सर्व उपक्रमांना शुभेच्छा दिल्या.

समाजाच्या सुरक्षिततेसाठी सतत कार्यरत असणाऱ्या पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी संपूर्णपणे मोफत करण्यात येईल असे आश्वासन या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. विवेक रेडकर यांनी दिले. ट्रस्टच्या वेबसाईटमुळे ट्रस्टचे ज्येष्ठ नागरिकांसाठी चालणारे काम जागतिक पातळीवर जाईल, असा विश्वास याप्रसंगी वेब डिझायनर आशिष पेडणेकर यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page