⚡मालवण ता.२०-: श्री रामेश्वर वाचन मंदिर, आचरा, श्रीम.रजनी ठाकूर व श्रीम. विजयालक्ष्मी ठाकूर प्रायोजित ‘कथाकथन स्पर्धा ‘(आचरा शाळा मर्यादित) इ.५वी ते ७वी च्या विद्यार्थ्यांसाठी शनिवार दि.२६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता आयोजित केली आहे.
यात प्रत्येक शाळेतून फक्त ३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असून स्पर्धेसाठी विषय- मला आवडलेली गोष्ट हा देण्यात आला असून गोष्टीसाठी विषयाचे बंधन नाही. कथाकथन साठी वेळ ५ ते ७ मिनिटे असणार आहे. विजेत्यांना रोख रक्कमेची आकर्षक बक्षिसे व सहभागी विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहेत. अधिक माहितीसाठी ०२३६५ – २४६०१७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
