विज पडून झाडाला लागली आग

कणकवली रेल्वे स्थानकानजीक प्रकार

⚡कणकवली ता.२१-: गेले चार दिवस विजांच्या गडगडाटासह पावसाचा धुमाकूळ सुरू असतानाच गुरुवारी दुपारी अचानक दीड वाजण्याच्या सुमारास कणकवली रेल्वे स्थानकानजीक वीज कोसळली. यावेळी प्लॅटफॉर्म नंबर एक च्या ठिकाणी असलेल्या माडाच्या झाडावर वीज पडल्याने झाड जळाले सुदैवाने या जीवित हानी झाली नाही पण सततच्या विजांच्या गडगटाने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत.

बुधवारी सायंकाळी कनेडी येथे विज पडून आठ महिला जखमी झाल्या होत्या तसेच काही दिवसापूर्वी साळीस्ते येथील एका व्यक्तीवर वीज पडून मृत्यू झाला होता त्यामुळे अचानक पडणाऱ्या पावसाने व विजांच्या गडगटाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कणकवली रेल्वे स्टेशन येथील माडाच्या झाडावर वीज कोसळले मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होती याच दरम्यान मोठा गडगडाट करीत नजिकच्या माडाच्या झाडावर वीज कोसळली.

You cannot copy content of this page