सामाजिक बांधिलकी संघटनेच्यावतीने टेलिफोन विभागाकडे मागणी
⚡सावंतवाडी ता.२१-: सावंतवाडी नगरपरिषदेच्या समोरील फुटपाथवर गेल्या कित्येक दिवसांपासून टेलिफोनची ची केबल खाली झुकून लोंबकळत असल्या कारणाने फुटपाथ वरून ये – जा करणारे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी तसेच सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांच्या डोक्याला लागत आहे. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तरी टेलिफोन विभाग ऑफिस मधील संबंधित कर्मचाऱ्यांनी याची दखल घेऊन फुटपाथवर लोंबकळत असलेली केबल वर घेऊन शहरातील नागरिकांना सहकार्य करावे अशी मागणी सामाजिक बांधिलकी संघटनेच्यावतीने करत करण्यात आली आहे.
