मळेवाड कोंडूरे ग्रामपंचायतच्यावतीने २३ रोजी नरकासुर व आकाश कंदील स्पर्धा

विशाल परब यांच्या उपस्थितीत संजू परब करणार उद्घाटन

⚡सावंतवाडी ता.२१-: ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून 23 ऑक्टोंबर रोजी नरकासूर व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून याचे शुभारंभ सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या शुभहस्ते तर युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षीप्रमाणे याही दिवाळीनिमित्त ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे कडून दिनांक 23 ऑक्टोंबर 2022 रोजी गाव मर्यादित नरकासुर स्पर्धा व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.स्पर्धेचा शुभारंभ सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्या शुभहस्ते तर युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.नरकासुर स्पर्धेसाठी नरकासुराची उंची कमीत कमी आठ फूट असावी.तर आकाश कंदील हा पर्यावरण पूरक असावा.नरकासुर स्पर्धा प्रथम क्रमांक 5000 रुपये, द्वितीय क्रमांक 3000 रुपये, तृतीय क्रमांक 1500 रुपये.तर आकाश कंदील स्पर्धा प्रथम क्रमांक 1500 रुपये,द्वितीय क्रमांक 1000 रुपये,तृतीय क्रमांक 500 रुपये तसेच दोन्ही स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला चषक अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

You cannot copy content of this page