एनएसएस स्वयंसेवकांकडून मालवण बस स्थानक परिसराची स्वच्छता

⚡मालवण ता.२०-:
स्वच्छ भारत अभियान अभियानांतर्गत मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्या वतीने गुरुवारी मालवण बस स्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली.

राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. शंकर खोबरे व सहायक प्रा. बी. एच. चोगुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांनी मालवण बस स्थानक परिसरातील प्लास्टिक आणि इतर कचरा जमा केला व बस स्थानक परिसर स्वच्छ केला. या उपक्रमात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सर्व स्वयंसेवकांनी उत्स्फुर्तपणे सहभाग घेतला. या अभियानात सहभागी सर्व स्वयंसेवकांना मालवण येथील रामेश्वर मेडीकलचे अमेय पारकर व श्रेया अटक यांनी मोफत हातमोजे दिले. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीय सेवा योजना विभागाने विद्यार्थ्यांसोबतच बस स्थानक परिसरात उपस्थित असणार्या प्रवाशांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले.

You cannot copy content of this page