⚡मालवण ता.१७-: आचरा येथील कणकवली रोडलगत बापर्डेकर यांच्या कलम बागेत मंगळवारी सकाळी दहा वाजता मालवण तालुका कृषी विभागाच्या सहकार्याने आंबा पुनरजीवन (आंबा छाटणी) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे
सदर प्रशिक्षणासाठी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्राचे तज्ञ संशोधक मार्गदर्शन करणार आहेत.तरी सदर प्रशिक्षणाचा लाभ आचरा पंच क्रोशीतील शेतकरी बांधवांनी घेण्याचे आवाहन मालवण तालुका कृषी अधिकारी यांच्या कडून करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण
आचरा कणकवली रोड येथील पटेल यांच्या स्वा मिल च्या बाजुला बापर्डेकर यांच्या आंबा बागेत होणार आहे.
