मालवण ता.१७-:
ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न) मालवण यांच्यावतीने अणाव आनंदाश्रयातील निराधार वृद्धांच्या आश्रमास दिवाळी फराळ देण्याचा उपक्रम २० ते २३ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत राबविण्यात येणार आहे. यावेळी संघाच्या सदस्यांनी तांदूळ, धान्य, नवीन कपडे, उटणे, साबण, वॉशिंग पावडर, मिठाई, दिवाळी पदार्थ, तेल आदी वस्तू भाऊ हडकर यांच्याकडे आणून दयाव्यात. जमा झालेल्या वस्तू २३ रोजी दुपारनंतर आश्रमास येणार आहेत. जास्तीत जास्त सदस्यांनी उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन कार्यवाह बाळकृष्ण माणगावकर यांनी केले आहे.
मालवण जेष्ठ नागरिक संघ अणाव आनंदाश्रमाला देणार दिवाळी फराळ
