पेंडुर सातवायंगणी येथील प्रकार;पायाला झाली दुखापत; वनविभागाकडून तात्काळ दहा हजारची मदत..*
⚡सावंतवाडी ता.१७-: वेंगुर्ला येथील मौजे पेंडूर सातवायगणी येथील शांताराम नाईक हे आपल्या शेतात काम करत असताना त्यांच्यावर रान गव्याने हल्ला केला असून, या हल्ल्यात त्यांच्या पायाला दुखापत झाली आहे. यावेळी त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती मिळताच कुडाळ वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमृत शिंदे यांनी आपल्या वन कर्मचाऱ्यांसह उपजिल्हा रुग्णालयात येऊन त्यांची भेट घेत वैद्यकीय उपचार करीत तातडीने १० हजार रुपयेची मदत त्याच्या पत्नीकडे सुपूर्द केली आहे.
