कणकवली गट विकास अधिकाऱ्यांचे शिक्षक प्रतिनिधीना आश्वासन
⚡कणकवली ता.१७-: सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना त्यांचे दरमहाचे निवृत्ती वेतन प्रत्येक वेळी या ना त्या कारणाने विलंबाने होत आहे. त्यामुळे अनेक ज्येष्ठ तथा वयोवृध्द प्राथमिक शिक्षकांना अनेक प्रकारच्या आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाकडून त्या त्या बँक शाखेचे चेक दिले जातात. सदरचे चेक क्लिअरन्स वगैरे बाबी होईपर्यंत त्याला आणखी विलंब होतो त्यासाठी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांची शिक्षक प्रतिनिधी सुरेश पेडणेकर, रविंद्र मुसळे, सुधाकर देवस्थळी, लक्ष्मण प्रभू व अनंत पालकर यांनी समक्ष भेट घेऊन नविन जलद कार्यपद्धती अवलंबिण्याबाबतचे निवेदन सादर केले.
आपल्या कार्यालयाकडून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली यांच्याकडे तालुक्यातील विविध बँकेच्या खात्यावर जमा होण्यासाठी जे धनादेश ऑनलाईन अथवा ऑफ लाईन देऊन त्यासोबत शिक्षकांची यादी देऊन ती रक्कम संबंधित बँकेकडे वर्ग होण्यासाठ चेक क्लिअरन्स बगैरे बाबी होईपर्यंत विलंब होतो, त्याऐवजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कणकवली यांच्याकडे बँकेचे नाव, बँक शाखा, बैंक शाखेचा IFSC कोड, पेंशन कोणत्या महाची, निवृत्ती शिक्षकाचे नाव, खाते क्रमांक व जादा रक्कम अशी माहिती ऑनलाईन दिल्यास त्या बँकेकडून NEFT/RTGS द्वारा एका क्लिकमध्ये संबंधित शिक्षकांच्या बँक खात्यावर त्वरीत जमा होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
यावर गटविकास अधिकारी पंचायत समिती कणकवली यांनी आपल्या सहाय्यक लेखा अधिकारी श्री. तांबे व श्री. धुरी यांच्याशी चर्चा करुन जास्तीत जास्त याच महिन्यापासून उद्याची होणारी पेन्शन या पध्दतीने करण्यात येईल असे ठोस आश्वसन दिले. त्यावर शिक्षक प्रतिनिधीनी समाधान व्यक्त केले व एका क्लिकवर संपूर्ण तालुक्यातील सर्व शिक्षकांची पेन्शन एकाच वेळी होईल याची प्रतिक्षा करु असे सांगितले. शेवटी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण व इतर अधिकारी यांचे आभार व्यक्त केले.
