*…अन्यथा पालकमंत्र्यांची तिरडी यात्रा काढू

*भाजप प्रवक्ते संजू परब यांचा पत्रकार परिषदेत गंभीर इशारा*

*💫सावंतवाडी दि.०२-:* बांदा व दोडामार्ग रस्ता पूर्णपणे खराब झाला असून, येथील जनता गेले अनेक वर्ष रस्तासाठी लढा देत आहे. परंतु येथील आमदार या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते संजू परब यांनी केला आहे. तसेच जर १ मार्च पर्यत हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त न झाल्यास पालकमंत्र्याची तिरडी यात्रा काढू असा इशारा भाजप जिल्हा प्रवक्त संजू परब यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. ते सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी दोडामार्ग नगरसेवक संतोष नानचे , संरपंच अक्रम खान, मंकरंद तोरसकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.*…अन्यथा पालकमंत्र्यांची तिरडी यात्रा काढू*

You cannot copy content of this page