भाजप युवा नेते विशाल परब : 2024 साल निलेश राणे यांच्यासाठी विशेष असणार
⚡कुडाळ ता.१५-: आजपर्यंत मी समाजातील माता भगिनसाठी काम केले व करत राहणार. यापुढेही आयुष्यात मी जनतेसाठीच काम करत राहणार. त्यामुळे भविष्यातही असेच सामाजिक कार्यक्रम राबवणार असे प्रतिपादन भाजप युवा नेते विशाल परब यांनी केले. दरम्यान २०२४ साली निलेश राणे यांच्यासाठी विशेष असणार असल्याचे श्री.परब म्हणाले.
विशाल परब पुढे म्हणाले, मला ज्यांनी घडवल महाराष्ट्रात ज्यांचा दबदबा आहे असे आमचे राजकीय तसेच सर्वच क्षेत्रातील नेते नीलेश राणे हे माझे गुरू आहेत. नीलेश राणे आणि माझं नातं इथं बोलण्या एवढं लहान नाही आहे . तसेच महाराष्ट्र ज्यांनी सध्या हादरवून टाकलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाची ज्यांनी शोभा वाढवली शहाजी पाटील यांचं मी माझ्या सिंधुदुर्गनगरी स्वागत करत आहे
