जनतेची सेवा करणे हेच आमचे कर्तव्य

८० टक्के समाज कार्य व २० टक्के राजकारण : उदयोजक किरण सावंत

देवगड-प्रतिनिधी
जनतेची सेवा करणे हेच आमचे कर्तव्य असून ८० टक्के समाज कार्य व २०टक्के राजकारण या सुत्राने आम्ही काम करतो देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील सर्वच नगरसेवक यामुळे विकास कामाच्या दृष्टीकोनातून आमच्या कायम संपर्कात असतात असे मत उदयोजक किरण ऊर्फ भैय्या सावंत यांनी देवगड येथे बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट ) कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी पत्रकारांची बोलताना व्यक्त केले.
देवगड येथे बाळासाहेबांची शिवसेना (शिंदेगट) कार्यालयाचे उदघाटन शिंदे गटाचे किरण सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विलास साळसकर,अमोल लोके,पिटी पेडणेकर,सचिन जोईल,संजय आंग्रे,संदेश पटेल,शेखर राणे आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना सामंत म्हणाले की, २०ऑक्टोंबर रोजी मालवण येथे बाळासाहेबांची शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात येणार आहे. याच आढावा बैठकीसाठी आपण आलो आहोत. तसेच येथील जनतेच्या मच्छिमारांच्या समस्या देखील जाणून घेवून आपण सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. कुणावरतीही टिका करण्यापेक्षा विकास कामातून आपले काम दाखविले जाणार आहे. देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील बहुतांश नगरसेवक नगरपंचायतीच्या विकासासाठी आपल्याशी संपर्क साधून येत असतात बाळासाहेबांच्या शिंदे गटामध्ये प्रवेश करण्यासाठी आपण कधीही कुणाला कुठलेही आमिष दाखविलेले नाही व दाखविणार नाही ज्यांना स्वतहून स्वच्छ मनाने शिंदे गटामध्ये यावेसे वाटते अश्या कार्यकर्त्यांना नक्कीच प्रवेश दिले जाईल असे बोलून काहि दिवसांतच देवगड जामसंडे नगरपंचायतीमधील परिवर्तन घडण्याचे संकेतच दिले. यावेळी किरण सामंत यांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. व अनेक मच्छिमार तसेच देवगड पोलीस पाटील संघटना तसेच इत्तर संघटनांनी निवेदन सादर करुन आपल्या समस्या मांडल्या यावेळी सामंत यांनी संघटनांच्या समस्यांचा शासन दरबारी पाठपुरावा करुन सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देखील त्यांनी दिले.

You cannot copy content of this page