⚡बांदा ता.१५-: जागतिक वाचन दिवस भारतरत्न माजी राष्ट्रपती ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. तसेच जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात आला.
यासंदर्भात अंगणवाडी सेविका प्रियांका राणे यांनी माहिती दिली. यावेळी सरपंच समीर गावडे, उपसरपंच गुरुदास गवंडे, ग्रामसेविका तनवी गवस, तलाठी भाग्यशीला शिंदे, आरोग्यसेवक निळकंठ बांदवलकर, आरोग्यसेविका रश्मी शेणई, अंगणवाडी सेविका नूतन निगुडकर, मदतनीस विजयालक्ष्मी शिरसाट, लक्ष्मी पोखरे, तंटामुक्ती अध्यक्ष वासुदेव गावडे, सामाजिक कार्यकर्ते वसंत जाधव, आरोग्य कर्मचारी अर्जना महाले, रंजीता नाईक, राजन निगुडकर, साक्षी नाईक, प्राची कुणकेरकर, संदीप नाईक तसेच ग्रामपंचायत कर्मचारी लवु जाधव व परेश गावडे आदी उपस्थित होते.
निगुडे ग्रामसेविका तन्वी गवस यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.
