⚡सावंतवाडी ता.१५सहदेव राऊळ-: श्री साटम महाराज कला क्रिडा सेवा मंडळ, निरवडे झरबाजार यांच्यावतीने कै. विलास तानावडे व कै. दयानंद काळसेकर यांच्या स्मरणार्थ गुरुव्दादशीनिमित्त शनिवार २२ ऑक्टोबर रोजी निमंत्रित भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे सायंकाळी ५ वाजता उद्घाटन व ६ वाजल्यापासून भजन स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या भजन स्पर्धेत प्रथम पारितोषिक ५००१ रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्रव्दितीय, द्वितीय पारितोषिक ३००१ रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तृतीय पारितोषिक २००१ रुपये सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र ठेवण्यात आले आहेत. तसेच उकृष्ट हार्मोनियमवादक १००० रुपये, उकृष्ट गायक १०००, उकृष्ट पखवाजवादक १०००, उकृष्ट तबलावादक १०००, उकृष्ट झांजवादक १०००, उकृष्ट कोरस १०००, अशी वैयत्किक बक्षिसेही ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत सायंकाळी ६. वाजता प्राथमिक शिक्षक कला मंच भजन मंडळ, ( कुडाळ), सायंकाळी ७. वाजता महापुरुष भजन मंडळ, ( पिंगुळी) रात्री ८. वाजता दत्तकृपा भजन मंडळ, ( वैभववाडी) , रात्री ९. वाजता रवळनाथ भजन मंडळ, ( पिंगुळी) , रात्री १०. वाजता स्वरधारा भजन मंडळ, ( तांबोळी) , रात्री ११. वाजता नादब्रम्ह भजन मंडळ, ( कसाल) , रात्री १२. वाजता दत्तगुरु भजन मंडळ, ( वैभववाडी) , रात्री १. वाजता सद्गगुरुनाथ भजन मंडळ, ( तुळस) , रात्री २. वाजता सद्गगुरु भजन मंडळ, ( तुळस वडखोल) हे संघ सहभागी होणार आहेत.
