गणेश सजावट स्पर्धेत आंबोली येथील प्रथमेश गावडे प्रथम

सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने घेण्यात आली होती स्पर्धा

⚡सावंतवाडी ता.१५- : सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने घेण्यात आलेल्या गणेश सजावट स्पर्धेतसावंतवाडी तालुक्यातून आंबोली येथील प्रथमेश गावडे यांनी प्रथम, अमेय गावडे द्वितीय तर रितेश राणे, वेर्ले यांनी तृतीय क्रमांक मिळवला.

उत्तेजनार्थ म्हणून अपूर्वा नाईक न्हावेली व महेंद्र चव्हाण, चौकुळ यांना बक्षीस देण्यात आले. कुडाळ येथे माजी मंत्री सतेज पाटील याच्या हस्ते बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रभारी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत ,रुपेश आईर, पुंडलिक गावडे,संतोष सावंत, अशोक राऊळ,संजय गावकर, राघवेंद्र नार्वेकर, संजय लाड,बाब्या म्हापसेकर, चंद्रकांत राणे, अभय मालवणकर,संदीप सुकी, बाळा नमशी, प्रथमेश गावडे, रितेश राणे, आनंद कुंभार,जास्मिन लक्ष्मेश्वर, विभावरी सुकी, स्मिता वागळे, अमेय गावडे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page